ई-बाईक सवलत कार्यक्रमाला वॉशिंग्टन राज्याच्या विधानमंडळाच्या परिवहन अर्थसंकल्पातून निधी दिला जातो. हा निधी ' क्लायमेट कमिटमेंट ॲक्ट'मधून येतो . वॉशिंग्टन राज्य परिवहन विभागाच्या सक्रिय परिवहन विभागावर विधानमंडळाने ठरवलेल्या नियमांनुसार या कार्यक्रमाची रचना आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- साठ टक्के निधी $1200 च्या सवलतींसाठी आणि चाळीस टक्के निधी $300 च्या सवलतींसाठी दिला जातो.
- सवलत मिळण्यापूर्वी, लोकांनी अर्ज सादर करणे, त्यांची निवड होणे आणि मंजुरीसाठी पात्रतेची कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वॉशिंग्टन राज्यातील ई-बाईक्सची विक्री आणि सेवा देणाऱ्या मान्यताप्राप्त बाईक शॉपमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- सवलतीचा वापर पात्र ई-बाईक खरेदी करण्यासाठीच केला पाहिजे.
२०२३-२०२५ मध्ये एक प्रायोगिक सवलत कार्यक्रम सुरू करण्यात आला. ३७,००० पेक्षा जास्त लोकांनी अर्ज करण्यासाठी लॉग इन केले आणि ११,००० पेक्षा जास्त लोकांची निवड करून त्यांना त्यांची पात्रतेची कागदपत्रे सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. तुम्ही या प्रायोगिक कार्यक्रमाबद्दल आणि त्याच्या परिणामांबद्दल WSDOT ATD च्या २०२५ च्या वैधानिक अहवालात अधिक वाचू शकता.
२०२५-२०२७ मध्ये आम्ही पुन्हा सुरू करू आणि WE-bike २०२७ च्या उन्हाळ्याच्या अखेरपर्यंत चालेल. सवलतींमध्ये खरेदीच्या १००% रकमेचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे.